Ashok Chavan
Ashok Chavan 
छत्रपती संभाजीनगर

भोकरमध्ये अशोक चव्हाणांना मोठी आघाडी

अभय कुळकजाईकर

नांदेड : नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे अशोक चव्हाण भोकरमधून 49 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे राजेश पवार  नायगाव मतदारसंघात 37 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

भाजपचे भीमराव केराम किनवट मतदारसंघात पिछाडीवर असून राष्ट्रवादीचे प्रदीप  नाईक तीन हजार 400 मतांनी आघाडीवर , भाजपचे डॉ. तुषार राठोड (मुखेड ) 11 हजार मतांनी आघाडीवर, कॉग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर (देगलूर) नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे मोहन हंबर्डे तीन हजार मतांनी आघाडीवर असून नांदेड उत्तर मध्ये शिवसेनेचे बालाजी कल्याणकर आठ हजार मतांनी आघाडीवर आहेत.  लोहा मतदारसंघात शेकापचे श्यामसुंदर शिंदे 18 हजार  मतांनी आघाडीवर आघाडीवर आहेत. हदगाव मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर 14 हजार आघाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT