One Died in Aurangabad Due to Corona
One Died in Aurangabad Due to Corona 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत कोरोनाचा एक बळी; ५८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबादेत एका ५८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालय, घाटीमध्ये आज हा रुग्ण मरण पावल्याचे सांगण्यात आले .औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णाची संख्या आठवर पोहोचली असतानाच आज यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

५८ वर्षीय हा रुग्ण मुंबईत एका बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे .दहा दिवसांपूर्वी ते शहरात आले होते, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर३ एप्रिल पासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शहरातील सातारा देवळाई परिसरात राहणाऱ्या या रुग्णास मधुमेहासह  इतरही आजार असल्याचे समजते.आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT