Our Field is like Film Industry Say Ashok Chavan
Our Field is like Film Industry Say Ashok Chavan 
छत्रपती संभाजीनगर

आमचा सिनेमा बरा चाललाय; महाविकास आघाडीवरुन अशोक चव्हाण यांचे वक्तव्य

संतोष जोशी

नांदेड : आमचं राजकीय क्षेत्र  सिनेमा,नाट्य क्षेत्रापेक्षा काही वेगळं नाही.... आमचा ही सिनेमा सध्या चांगला चालल्याचं  वक्तव्य पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल रात्री एका कार्यक्रमात बोलताना  केले.

तीन तीन हीरोंचा सिनेमा येत आहे. तसचं आमचं चालू आहे. पुर्वी मी दोन पक्षाचं सरकार चालवलं आता तीन पक्षाचं सरकार सुरू आहे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. येथील शांभवीज् अँकडमिच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात चव्हाण बोलतं होते. 

या निमित्ताने एकंदरच चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे व्यवस्थित सुरु असल्याचे संकेत दिले आहेत. या सोहळ्यास पद्मश्री वामन केंद्रे आणि अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हानियोजन समितीची  सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT