sanjay jadhv news
sanjay jadhv news 
छत्रपती संभाजीनगर

पांडुरंग कृपेने मदत घडते आहे म्हणत, संजय जाधव यांच्याकडून अन्नधान्याचे वाटप 

गणेश पांडे

परभणी ः परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी परभणी व आपल्या मतदारसंघात येत असलेल्या जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये साडेसहा हजार धान्य किटचे वाटप करत दिलासा दिला आहे.  लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्य व गोरगरीबांच्या जीवनावर प्रचंड प्रमाणात दिसून आला आहे. विशेष म्हणजे या धान्य किट वाटपाचे फोटो किंवा प्रसिध्दी करायची नाही असा पावित्रा घेत जाधव यांच्यावतीने जिल्ह्यातील गोरगरिबांना मदत करण्यासाठी हजारो हात समोर येत आहेत. 

कोरोनाचा धोका व वाढते रूग्ण लक्षात घेता लॉकडाऊनचा कालवाधी वाढवण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका हा हाततावर पोट असणाऱ्या हजारो कष्टकऱ्यांना बसतो आहे. अनेक कटूंबासमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे.

घरातील कर्ता माणुसच घराच्या बाहेर पडू शकत नसल्याने घरात पैसा कसा येणार? हा प्रश्न रोजच्या कमाई करणाऱ्यासमोर उभा राहिला आहे. घरात पैसा नसल्याने धान्य आणने अवघड झाले आहे. याची दखल घेत जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी तातडीने धान्याची व्यवस्था केली. 

अल्पावधीतच किराणा सामानाची यादी तयार करून एक महिणा पुरेल इतके धान्य व आवश्यक किराणा साहित्याची किट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. केवळ परभणी शहरच नाही तर जिल्ह्यातील सर्व तालुके, ग्रामीण भाग व जालना जिल्ह्यात विस्तारलेल्या त्यांच्या मतदारसंघातील गावांपर्यत त्यांच्या किटचे वाटप सुरु झाले आहे. दोन दिवसातच साडेसहा हजार किटचे वाटप संजय जाधव यांच्या मार्फत करण्यात आले. मदतीचा हा ओघ लॉकडाऊनच्या काळात सुरूच ठेवण्याचा निर्धार जाधव यांनी केला आहे. 

वाटप करणार, प्रसिध्दी नको 

केलेली मदत एका हाताने केली तर ती दुसऱ्या हाताला कळायला नको असे म्हटले जाते. पण सध्या जो प्रकार सुरू आहे तो अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे मदत देतांनाचे फोटो किंवा प्रसिध्दीपत्रक न काढण्याचा निर्णयच जाधव यांनी घेतला आहे.

या संदर्भात बोलतांना खासदार संजय जाधव म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत लोक अडचणीत आहेत, त्यामुळे फोटो कशाला हवाय, पांडूरंग कृपेने मदत घडत आहे. मात्र या काळात प्रसिध्दी नको आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT