Pankaja Munde And Dhanajay Munde on One Dias
Pankaja Munde And Dhanajay Munde on One Dias 
छत्रपती संभाजीनगर

कट्टर विरोधक मुंडे भावंडे चक्क एका व्यासपीठावर

दत्ता देशमुख

बीड : राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी आणि कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे शुक्रवारी चक्क एका व्यासपीठावर आले. त्याचे कारण ठरले पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ यांचा पुण्यतिथी सोहळा.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात गडांना मोठे महत्व आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर शुक्रवारी संत वामनभाऊ यांचा पुण्यतिथी सोहळा होता. या सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दोघेही हजर होते. विधानसभा निवडणुकीच्या नंतर ते दोघे प्रथमच एका व्यासपीठावर दिसले. 

तसे मागच्या सत्तेच्या काळातही दोघांनी एकत्र येणे टाळलेलेच होते. अगदी पंकजा मुंडे पालकमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास कामांच्या आढावा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना धनंजय मुंडे हजर नसत. त्यावेळी दोघांनाही राजकीय शिष्टाचार असल्याने शासकीय कार्यक्रमांच्या पत्रिकांवर दोघांची नावे असली तरी ते एकत्र नसत परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एकत्र दिसले.

दरम्यान, मागच्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे गडावर जात परंतु पहाटेच पुजा करुन परतत असत. तर, मंत्री असल्याने पंकजा मुंडे मुख्य सोहळ्याला हजर राहून पुजा करत. यावेळी मात्र, धनंजय मुंडे गुरुवारी रात्रीच गडावर मुक्कामी गेले होते. शुक्रवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य पुजा झाली. त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमावेळी दोघेही एकाच व्यासपीठावर आले. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT