dhanjay-munde-tt
dhanjay-munde-tt 
छत्रपती संभाजीनगर

परळीकरांच्या  पाणीटंचाईला पंकजा मुंडेच जबाबदार : धनंजय मुंडे

प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ (जि. बीड) : परळीच्या भाजपा आमदारांनी स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातुन अमर्यादित पाणी घेतले. त्यामुळेच परळी शहराला पाण्याची टंचाई भासत आहेत. परळीकरांच्या हालअपेष्टांना त्याच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

परळीतील नागरिकांना अभूतपूर्व पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परळी शहराच्या पाणी टंचाईवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस - भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत.  पंधरवाड्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी काही प्रभागांत जाऊन टँकरचे पाणी स्वत: वाटप करत टँकरचे देयके सरकार देते, पालिकेचा संबंध नसून पालिक पाणी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप केला होता. 

त्याला आता धनंजय मुंडे यांनी वॉटर व्हिलर वाटप कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला परळीचे पाणी घेतले. मात्र, शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत आणि परळीकरांचे पाणीही पळवले. असा आरोप धंनजय मुंडे यांनी केला. नगरपालिकेच्या टँकरने पाणी वाटप करण्यापेक्षा पालकमंत्री आणि या भागाच्या आमदार म्हणून परळीतल्या जनतेला पाणी देण्यासाठी त्यांनी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT