parbhani-mahapalika 
छत्रपती संभाजीनगर

परभणीत स्वीकृत सदस्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून आलेल्या नावाना काँग्रेस नगरसेवकांचा विरोध  

आयुक्त पाच-दहा मिनीटे उशिरा आल्याचा आयताच मुद्दा मिळाला नसता तर या पक्षांना सभा का तहकुब केली याची कारणे देता-देता नाकी नऊ आले असते.

गणेश पांडे : सरकारनामा

परभणी    :  परभणीत स्वीकृत सदस्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून आलेल्या नावाना काँग्रेस नगरसेवकांचा विरोध  महापालिका सर्वसाधारण सभेत न बोलताही दिसून आला . स्वीकृत  सदस्यांची नावे ठरविण्यासाठीची सभा काँग्रेसच्या नगरसेवकांनी इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या मदतीने चक्क तहकूब करायला लावली . 

महापालिकेची सभा तहकुब होण्याचे तात्कालीक कारण काहीही असो परंतू काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून आलेल्या नावांना तीव्र विरोध करणाऱ्या नगरसेवकांची सर्वसाधारण सभा तहकुब करण्याची खेळी मात्र यशस्वी झाल्याची चर्चा सुरु आहे. त्या नाराज नगरसेवकांना सर्वपक्षीय नगरसेवकांची साथ मिळाल्यामुळेच हा डाव उलटवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

काही महिन्यापुर्वीच महानगरपालिकेच्या सत्ताधारी व प्रशासनाविरुध्द रान उठवणाऱ्या इतर  पक्षाच्या नगरसेवकांची काँग्रेसच्या नाराज गटाला शुक्रवारी  सभागृहात साथ मिळाली. काँग्रेस नगरसेवकाच्या सभात्यागाच्या आवाहनाला त्यांनी देखील जलद प्रतिसाद दिला .  अखेर सभा गणपुर्ती अभावी तहकुब झाली. जर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना आणि  भाजप  पक्षांनी ठरवले असते तर सभा निश्चितच झाली असती. 

सभागृहात सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे सर्व मिळून 32 नगरसेवक आहे. अन्य पक्षांचे 33 नगरसेवक आहेत. गणपुर्तीसाठी 22 नगरसेवक आवश्यक ठरतात. परंतु सभागृहात काँग्रेसच्या सहा व अन्य पक्षाच्या सहा अशा केवळ 12 सदस्यांनीच हजेरी लावली. यावरून विरोधी पक्षीय सदस्यांनी देखील काँग्रेसच्या नगरसेवकांनी शोधलेल्या कारणाला साथ देत सभागृह सोडण्याचा, सभागृहात न जाण्याचे धोरण स्विकारून मदतीचा हात दिला. 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता.तीन) काँग्रेससह भारतीय जनता पक्षाच्या स्विकृत सदस्यांबाबत निर्णय होणार होता. परंतु गुरुवारी (ता.दोन) काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडून आलेल्या नावांबद्दल काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला होता.

नगरसेवकांना विश्वासात न घेता नावे लादल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. अनेकांनी तर राजीनामे दिल्याची चर्चा होती. स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या याद्यांधील नावांव्यतिरीक्त नविच नावे आल्यामुळे अतिशय संतप्त झालेल्या नगरसेवकांनी शुक्रवारची  सर्वसाधारण सभाच होऊ न देण्याचा चंग बांधल्याची चर्चा होती. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेकडे मदतीचा हात पुढे केल्याचेही बोलले जाते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT