Nirmala Choudhary Parbhani ZP Chairman Ajya Choudhary Vice Chairman
Nirmala Choudhary Parbhani ZP Chairman Ajya Choudhary Vice Chairman 
छत्रपती संभाजीनगर

परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपदी निर्मला विटेकर; उपाध्यक्ष पदी अजय चौधरी बिनविरोध

सरकारनामा ब्युरो

परभणी - येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सदस्यांची वर्णी लागली आहे. अध्यक्षपदी निर्मला विटेकर तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे. शिवसेनेत उपाध्यक्ष पदासाठी एकमत न झाल्याने ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहेत.

परभणी जिल्हा परिषदेच्या उर्वरित अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष - उपाध्यक्षांची निवड मंगळवारी (दि. ७) करण्यात आली. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वाधिक २३ सदस्य आहेत.  पुढील अडीच वर्षांसाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होणार हे निश्चित होते.

परंतु, राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग परभणी जिल्हा परिषदेत देखील होईल असे वाटत होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक देखील घेतली. यावेळी दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड घेण्यासंदर्भात सर्वांचे एकमत घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी शिवसेनेने आपल्याला उपाध्यक्षपद मिळावे अशी मागणी केली होती. या बैठकीत त्यांना हे पद देण्यात यावे असे ठरले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी उपाध्यक्षपद आपल्या गोटातील सदस्यास मिळावे यासाठी आग्रह धरला होता. परंतू शिवसेनेच्या १३ सदस्यांमध्ये उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यावरून अखेरपर्यंत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्याच  सदस्यांचीच नावे पुढे आली. अध्यक्षपदासाठी निर्मला विटेकर आणि उपाध्यक्ष पदासाठी अजय चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची निवड घोषित करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT