prashant bamb 
छत्रपती संभाजीनगर

आमदार प्रशांत बंब सत्कार सोडून या कामाला लागले 

राज्यभर निवडणुकीचे वातावरण असल्याने पुढारी त्यात, तर प्रशासन निवडणुक कामात व्यस्त होते.

अविनाश संगेकर

लासूरस्टेशन :  राज्यभरात ऐन पीक काढणीच्यावेळी तालुक्‍यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यभर निवडणुकीचे वातावरण असल्याने पुढारी त्यात, तर प्रशासन निवडणुक कामात व्यस्त होते. परिणामी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे आणि झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्षच झाले.

गंगापूर- खुलताबाद मतदारसंघातून मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाल्यानंतर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी मात्र स्वागत, समारंभ, मिरवणूकीला फाटा देत थेट नुकसानग्रस्त पीक परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांना निर्देश दिले.

मतदारसंघात सर्वत्र पीक कापणीची कामे चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी मका सोयाबीन तसेच इतर पिकांची काढणी करून रास तयार करून ठेवली होती. पण निवडणुकीच्या काळातच पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये आमदार बंब यांनी दोन्ही तहसीलदारांना तात्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

याबरोबरच पंतप्रधान पिक विमा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता विमा कंपनीला भरला आहे अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत वेगळा अहवाल करून पिक विमा कंपनीला सादर करण्याबाबतही त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

एकीकडे राज्यभरातील नवनिर्वाचित आमदार स्वागत समारंभामध्ये व्यस्त असताना आमदार बंब मात्र मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी धावून आल्याचे चित्र आहे. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवून तिसऱ्यांदा विजय मिळवल्याने बंब यांचा आत्मविश्‍वास वाढला असून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबद्दल दाखवलेली तत्परतता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT