Raosaheb_Danve on alliance
Raosaheb_Danve on alliance 
छत्रपती संभाजीनगर

भाजप-शिवसेना एकत्रच लढणार : दानवे 

भास्कर बलखंडे

जालना :  राज्य सरकारने पाच वर्षाच्या कार्यकाळात उत्तम कामगिरी केली आहे,हा संदेश लोकापर्यंत पोहचविण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे.

या यात्रेचे राज्यात उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. जनादेश यात्रा उद्या सांयकाळी जालना शहरात पोहचणार आहे. डॅा.फ्रेझर हायस्कुल येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदप्रसाद नड्डा  यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे,अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसह अन्य विविध प्रश्नावर  श्री.दानवे यांनी मंगळवारी (ता.27) जालन्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी भास्कर दानवे, राजेश राऊत, सिध्दीविनाय मुळे ,श्री.शेजूळ आदींची उपस्थिती होती.

श्री.दानवे यांनी भाजप -शिवसेना युतीबाबत दररोज होत असलेल्या चर्चेवरही भाष्य केले.ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा फार्मुला  अगोदरच निशि्चत झाला आहे. योग्य वेळी तो जाहीर केला जाईल. या घडीला भाजपात प्रवेश करण्यासाठी राज्यभरात 17 बडे नेते रांगेत  असल्याचा गैाप्यस्फोट करीत दोन्ही पक्ष निवडणुक  एकत्रच लढणार असल्याचा पुनरूच्चार श्री.दानवे यांनी केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी 76 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.याबाबत विचारलल्या एका प्रश्नाच्या अनुषंगाने  दानवे म्हणाले की, या प्रकरणी भाजपने सूडबुध्दीने गुन्हे दाखल करण्यास सांगितले नाही, तर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे  दाखल  झाले आहेत. आमदार अब्दुल सत्तार हे माझे राजकीय नव्हे तर वैयक्तिक मित्र असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT