sambhaji_patil_nilangekar
sambhaji_patil_nilangekar 
छत्रपती संभाजीनगर

पीक विमा प्रतिनिधींना संभाजी निलंगेकरांनी भरला दम 

सरकारनामा

निलंगा (बातमीदार)  लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज काही गावांना भेटी देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी तंबी त्यांनी दिली. पीकविमा प्रतिनिधींना त्यांनी फैलावर घेतले.

निलंगेकर यांनी तालुक्‍यातील औराद शहाजनी, हलगरा, आंबुलगा आदी मंडळातील गावांना भेटी दिल्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर आदी सहभागी होते.

पावसामुळे उद्‌ध्वस्त झालेली शेती, आडवी झालेली पिके, काळी पडलेली हायब्रीड ज्वारी आदींची पाहणी केली. नगदी समजला जाणारा हंगाम पावसाने हिरावला. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण, लग्नकार्य कसे करावे, असा प्रश्‍न अनेक शेतकऱ्यांनी भावनिक होऊन मांडला. पीकविमा कंपनीकडून सांगितल्या जाणाऱ्या थातूरमातूर सबबी आणि होणाऱ्या अडचणींचा पाढा शेतकऱ्यांनी वाचला. 


त्यावर निलंगेकर यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात फोन केला. सुरवातीला त्यांनी नुकसानग्रस्त सामान्य शेतकरी बोलत असल्याची बतावणी करीत कैफियत मांडली. तेंव्हा पीक विमा अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली .  त्यानंतर मात्र त्यांनी तातडीने पंचनामे करण्याची व नुकसानभरपाई देण्याची संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिली. मग विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे करण्याचे कबूल केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT