Beed Shivjayant Celebration in Presence of Sandip Kshirsagar
Beed Shivjayant Celebration in Presence of Sandip Kshirsagar 
छत्रपती संभाजीनगर

बीडमध्ये शिवजयंतीचा थाट; आमदार संदीप क्षीरसागरांमुळे शिवप्रेमींच्या डोळ्याचे फिटले पारणे

दत्ता देशमुख

बीड : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला बीडमध्ये विना वर्गणी आणि विना डॉल्बी परंपरा यंदाही कायम राहीली. त्यांच्यामुळे कलावंतांचे साहसी खेळ आणि ढोल पथकाची कला पाहून बीडकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून यंदा बीडमध्ये भव्य शिवजयंती पार पडली. दुपारी सुरु झालेली मिरवणुक रात्री उशिरापर्यंत चालली. दरम्यान, मागच्या काही वर्षांपासून त्यांच्या पुढाकाराने शहरात विना वर्गणी व विना डॉल्बीची परंपरा सुरु झाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून याचे स्वागत होत आहे. दरम्यान, यंदा मिरवणुकीत पंजाब, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांतील कलाकारांच्या साहसी खेळांचे आयोजन केले होते. या कलावंतांनी सादर केलेल्या कसरतीच्या खेळांनी बीडकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. 

काठ्यांचे खेळ, तलवारबाजी, आगीचे खेळ असे साहसी खेळ सादर करुन कलावंतांनी बीडकरांची वाहवा मिळविली. यासह सातशेवर कलावंतांच्या तरुण - तरुणींच्या ढोल पथकानेही बीडकरांचे लक्ष वेधून घेतले. यंदा प्रथमच पोलिसांच्या बॅंड पथकाने शिवरायांना मानवंदना दिली. दुपारी तीन वाजता सुरु झालेली मिरवणुक रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. डोळ्याचे पारणे फेडणारी मिरवणुक पाहण्यासाठी बीडसह परिसरातून शिवप्रेमी आले होते. 

महिलांचीही उपस्थिती लक्षणिय होती. दरम्यान, मिरवणुकीतील खेळ पाहताना महिलांची कुचंबना होऊ नये यासाठी आमदार क्षीरसागर यांनी सिद्धीविनायक संकुल येथे महिलांसाठी खास खेळ ठेवला. उपस्थित महिलांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींच्या आग्रहाखातर मग संदीप क्षीरसागर यांनीही हातात भगवा ध्वज घेऊन ठेका धरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT