Sandip-K-Rally
Sandip-K-Rally 
छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी केले जोरदार शक्ती प्रदर्शन

सरकारनामा

बीड : राजकीय ताकदवान काकांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरलेले संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तसे, संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही काकांना तीन वर्षांपूर्वी आव्हान दिले असले तरी समोरासमोर ही पहिलीच लढत आहे. त्यामुळे सामानाही रंगतदार होणार आहे.

संदीप क्षीरसागर यांनी तीन वर्षांपूर्वी काका मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत आव्हान दिले. जिल्हा परिषद आणि नगर पालिकेच्या निवडणुकीत आपली राजकीय ताकदही दाखविली. नंतर, राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी त्यांचे प्रयत्न होते. 

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना मंत्रीपदानंतर आता शिवसेनेची बीडमधून उमेदवारीही मिळाली आहे. दरम्यान, संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी खुद्द  शरद पवार यांनी जाहीर केली. संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने त्यांनी शहरातून भव्य फेरी आणि सभेच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. 

सकाळी त्यांनी निवडणुक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेत माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार सुनिल धांडे, माजी आमदार जनार्धन तुपे, अ‍ॅड. डी. बी. बागल, वडिल रविंद्र क्षीरसागर, आई रेखा क्षीरसागर, पत्नी नेहा क्षीरसागर, गंगाधर घुमरे, फारुक पटेल, बबन गवते, अ‍ॅड. हेमा पिंपळे, अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे, मोहन जाधव सोबत होते. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सुरु झालेली फेरी शहरातील प्रमुख मार्गांवरुन फिरली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे पावसातही फेरीला प्रतिसाद मिळाला. आता या गर्दीचे मतांत परिवर्तीत होणार का, याकडे लक्ष लागले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT