sandipan_bhumre_shiv_
sandipan_bhumre_shiv_ 
छत्रपती संभाजीनगर

कुणी कितीही यात्रा काढू द्या, पैठणमध्ये मीच विजयी होणार :  संदीपान भुमरे 

जगदीश पानसरे

औरंगाबादः निवडणुकीच्या तोंडावर यात्रा काढणारे पक्ष पाच वर्ष कुठे गेले होते, आता कुणी कितीही यात्रा काढू द्या, पैठणमध्ये मीच विजयी होणार, असा दावा पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रसेने नुकतीच पैठण तालुक्‍यातून शिवस्वराज्य यात्रा काढली. या यात्रेच्या निमित्ताने मतदारसंघात आलेले खासदार अमोल कोल्हे, अजित पवार, धनंजय मुंडे या सगळ्यांनीच सरकारवर टीकेची झोड उठवली होती. एवढेच नाही तर गेल्या पाच वर्षात पैठण मतदारसंघात झालेल्या विकासकामांची चौकशी आपण सत्तेवर आल्यावर करू ,असा इशारा देखील यात्रे दरम्यान देण्यात आला होता. 

या पार्श्‍वभूमीवर आमदार संदीपान भुमरे आपली भूमिका स्पष्ट करतांना म्हणाले, पाच वर्षात झालेला तालुक्‍यातील विकास विरोधकांच्या डोळ्यात खूपतो आहे. सगळी कामे व्यवस्थीत आणि चांगली झाली आहेत . त्यामुळे त्यांना कोणती चौकशी करायची ती करू द्या, त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. बर पाच वर्ष यांनी काय दिवे लावले तेही सांगावे. 

आम्ही सत्तेवर आलो तर 75 टक्के भूमिपूत्रांसाठी जागा राखीव ठेवू असे आश्‍वासन राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीच्या तोंडावर देत आहेत. पंधरा वर्ष राज्यात तुमची सत्ता होती, तेव्हा का नाही दिला भूमिपुत्रांना न्याय, कुणी रोखले होते?  असा सवाल देखील भुमरे यांनी केला. 

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होणार आहे. लोक पाच वर्षात केलेल्या विकासकामांची पावती मला दिल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी जर आम्ही तालुक्‍याचा विकास केला असा दावा करत असेल तर लोकांनी त्यांचा पराभव का केला? याचे आत्मचिंतन त्यांनी करायला हवे. राज्यात युतीची सत्ता असतांना आम्ही काहीच केले नाही का? असा प्रतिप्रश्‍न देखील भुमरे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT