satish chavans Victory celebrate in tuljapur news 
छत्रपती संभाजीनगर

जावयाच्या विजयाचे तुळजापूरकरांनाही कौतुक; भवानी मातेच्या महाद्वारासमोर जल्लोष...

मराठवाडा तसेच राज्य स्तरावरील अनेक नेत्यांनी प्रचार करत चांगलाच जोर लावला होता. त्यातच यावेळी कधी नव्हे ते मतांचा टक्का वाढला. त्यामुळे निवडणुकीत अधिकच चुरस निर्माण झाली होती. तरी देखील तुळजापूरकरांना सतीश चव्हाण यांच्या विजयाचा विश्वास होता.

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर ः तुळजापूरचे जावई असलेले सतीश चव्हाण यांच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील विक्रमी विजयाचा जल्लोष तुळजापुरात महाविका आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. भाजपच्या उमेदवाराचा दारून पराभव करत ५८ हजार एवढ्या रेकाॅर्डब्रेक मतांची आघाडी घेत चव्हाण यांनी मिळवलेल्या विजयाचे तुळजापूरकरांना जावई म्हणून भारीच कौतुक वाटत असल्याचे पहायला मिळाले.

तुळजापुरचे माजी नगराध्यक्ष आणि तुळजा भवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष दिवंगत मारूतीराव क्षीरसागर यांचे सतिश चव्हाण हे जावई आहेत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात त्यांनी सलग तिसऱ्य़ांदा विजय मिळवल्याने तुळजापुरात तुळजा भवानी मंदिराच्या प्रवेशद्वारासमाेर त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. 

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचारावेळी देखील तुळजापूरचा जावई तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे सहाजिकच तुळजापूरकरांची पसंती जावयाच्या बाजूनेच होती. अनेकांनी तर त्यांच्या विजयासाठी तुळजा भवानीला साकडे देखील घातले होते. तुळजापूरचा जावई पुन्हा आमदार होणार अशी चर्चा लोक एकमेकांमध्ये करायचे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने ती अंत्यत प्रतिष्ठेची बनली होती. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील ही जागा जिंकण्यासाठी सगळी शक्तीपणाला लावली होती. मराठवाडा तसेच राज्य स्तरावरील अनेक नेत्यांनी प्रचार करत चांगलाच जोर लावला होता. त्यातच यावेळी कधी नव्हे ते मतांचा टक्का वाढला. त्यामुळे निवडणुकीत अधिकच चुरस निर्माण झाली होती. तरी देखील तुळजापूरकरांना सतीश चव्हाण यांच्या विजयाचा विश्वास होता.

तुळजापूरच्या अनेक घराण्यांना राजकीय वारसा आहे. तसेच त्यांचे नातेवाईक देखील मोठ्या प्रमाणात राजकारणात आहेत. तुळजापूरचे चार जावई वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधून राजकारणाचे मैदान गाजवत आहेत. यातील बहुतांश हे आमदार आहेत. सतीश चव्हाण यांच्या प्रमाणेच येथील माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते  दिवंगत माणिकराव खपले यांचे जावई लक्ष्मण पवार हे गेवराईचे भाजपचे आमदार आहेत. पूर्वी मनसेचे आणि आता भाजपचे आमदार राम कदम यांची देखील तुळजापूर सासुरवाडी असून ते भालचंद्र गंगणे यांचे जावई आहेत.

तर काॅग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमर राजूरकर हे येथील तुळजा भवानीचे उपाध्ये आणि सेवानिवृत्त कोषागार अधिकारी बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब दिक्षीत यांचे जावई आहेत. विशेष म्हणजे या चारही विद्यमान आमदारांची सासुरवाडी तुळजा भवानी मातेच्या पुजारी घराण्याशी संबंधित आहेत हा देखील योगायोगच म्हणावा लागेल.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT