छत्रपती संभाजीनगर

शरद पवार करणार उद्या सोमवारी बीड जिल्ह्यात दुष्काळी पाहणी

सरकारनामा ब्युरो

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता. १३) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 

जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत. आष्टी, पाटोदा आणि बीड या तीन तालुक्यांत श्री. पवार दौरा करतील. 

शरद पवार यांचे सकाळी साडेदहा वाजता आष्टी तालुक्यातील खडकत येथे आगमन होईल. या ठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणुन घेतील. त्यानंतर याच तालुक्यातील सौताडा येथील गुराच्या छावणीस ते भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधतील. त्यानंतर नवगण राजुरी (ता. बीड) येथील गुरांच्या छावणीस भेट देणार आहेत. पिंपळवंडी (ता. पाटोदा) येथील गुरांच्या छावणीस भेट देऊन ते दुष्काळामुळे नुकसान झालेल्या फळबागांची पाहणी करतील.

त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT