औरंगाबाद : "आपला भगवा-आपली शिवसेना" या मोहिमेचा प्रारंभ औरंगाबादमध्ये झाला. या मोहिमेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना शिवसेना (shiv sena)जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Shiv sena latest news)
यावेळी दानवे यांनी एकनाथ शिंदे, भाजप, प्रभागरचना सदस्य यावरुन सरकारवर निशाणा साधला. अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. "जे लोक शिंदे गटात गेलेले आहेत ते परत येण्यासाठी आमच्याशी संपर्क साधत आहेत," असा गोप्यस्फोट शिवसेना जिल्हाप्रमुख आमदास अंबादास दानवे यांनी केला आहे.
"माझा भगवा- माझी शिवसेना" या योजनेविषयी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. दानवे म्हणाले, " ज्यांना जायचे होते ते गेलेले आहेत, आता कुणी जाण्याची शक्यता नाही. उलट जे गेले ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे हा विषय इथेच संपला आहे. "तीन सदस्य प्रभाग रचनेची भीती भाजपाला वाटत होती म्हणूनच प्रभागरचनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदल केला आहे," असा आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी केला.
"मुख्यमंत्र्यांच्या मनात भीती असल्याने म्हणून त्यांनी हा बदल केला असावा. भाजपला तीन सदस्य पद्धतीत भीती वाटत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी हा बदल केला असावा, असे दानवे म्हणाले. "आपला भगवा-आपली शिवसेना " या मोहिमेत औरंगाबादमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.पुढील निवडणुकीतील संभाव्य उमेदवार, इच्छूक उमेदवार यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे," असे दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.