Shivbhojan Meal Opening by Nawab Malik at Parbhani
Shivbhojan Meal Opening by Nawab Malik at Parbhani 
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत नवाब मलिक यांनी केला शिवभोजनाचा शुभारंभ

गणेश पांडे

परभणी : महाविकास आघाडीचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिव भोजनाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी परभणीत करण्यात आला. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी घोषणा देत पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुभ भोजनाचा स्वतः आस्वाद घेत शुभारंभ केला.

राज्यातील गोरगरिबांना कमी किमतीत भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राज्यातील गोरगरिबांना शिवभजन ही योजना सुरू केली जाईल, असे घोषित केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा शब्द पाळत राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शिव भोजन योजना सुरू केली. परभणीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते रविवारी (दि. २६) म्हणजे प्रजासत्ताक दिन करण्यात आला. 

पालकमंत्री नवाब मलिक यांनी लाभार्थ्यांच्या रांगेत बसून स्वतः शिव भोजनाचा आस्वाद घेतला जेवण सुरु होण्याआधी पालकमंत्र्यांनी उपस्थित लाभार्थी व नेतेमंडळींना 'छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी घोषणा देत भोजन सुरू करण्यास सांगितले.  पालकमंत्री स्वतः लाभार्थ्यांच्या रांगेत बसून भोजन घेत असल्याचे पाहून पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाबाई विटेकर यांनी देखील शिवभोजन घेतले. यावेळी खासदार संजय जाधव यांची देखील उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT