Shivsena MLA Abdul Sattar Visiting Farms
Shivsena MLA Abdul Sattar Visiting Farms 
छत्रपती संभाजीनगर

शिवसेनेचे अब्दुल सत्तार काढणार ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मोर्चा

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः निवडणुकीच्या विजयाचा आनंद राज्यभरात विशेषता मराठवाड्यात पडत असलेल्या पावसाने धुवून नेला. विजयी मिरवणुका, सत्कार, समारंभाची संधी देखील काही लोकप्रतिनिधींना मिळाली नाही, काहींनी दुष्काळाचे गांभीर्य ओळखत थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी तर थेट तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी 31 ऑक्‍टोबर रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील निवडणूक सत्तार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. वैयक्तिक सत्तार आणि त्यांनी नव्यानेच ज्या पक्षात प्रवेश केला, त्या शिवसेनेची इभ्रत देखील त्यांच्या विजयावर अंवलबून होती. विरोधकांनी एकत्रितपणे लढा दिल्यावरही सत्तार विक्रमी मतांनी विजयी झाले. मुंबईहून परतताच सत्तार यांनी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे झालेले नुकसाना पाहण्यासाठी शेत गाठले.

मक्‍याचे काढून ठेवलेली कणंस, त्याला कोंब फुटली, तर कापसाच्या बोंडांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसना झाले. अख्खे शेत पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आंनदावर देखील विरजण पडले. सत्तार यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न तर केलाच, पण नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासाठी कृषी आणि महसुल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कामाला देखील लावले. पण नुकसान इतक्‍या मोठ्या प्रमाणात झाले, की केवळ पंचनामे, करून भागणार नाही तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे गरज लागणार आहे. हे ओळखून अब्दुल सत्तार यांनी 31 ऑक्‍टोबर रोजी सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयावर ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT