shivsena canceled public meeting in Aurangabad
shivsena canceled public meeting in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये संजय राऊत यांच्या उपस्थितीत होणारा शिवसेनेचा मेळावा रद्द

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः राज्याच्या विविध भागात कोरोनाची लागण झालेले आणि संशयित रुग्ण आढळत असल्याने राजकीय पक्षांचे मेळावे, कार्यक्रम रद्द केले जात आहेत. मनसेच्या शिवजंयती मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेलाही ती नाकारण्यात आली आहे. एवढेच नाही तर १५ मार्च रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शहरात होणारा शिवसेनेचा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावाही रद्द करण्यात आला आहे. 

मनसेने तिथीनूसार शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे व अमित ठाकरे शहरात दाखल झाले आहेत. शिवसेनेने देखील १२ मार्च रोजी शिवजंयती साजरी करत मिरवणूक काढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र कोरोनाचा धोका पाहता पोलीसांनी मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या मिरवणूकीला परवानगी नाकारली आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. खैरे म्हणाले, तिथीनूसार शिवजयंती साजरी करण्याची शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली होती. शहरातून भव्य मिरवणूक देखील काढण्यात येणार होती. पण राज्य सरकारने कोरोनाचा धोका लक्षात घेता मिरवणूकीची परवानगी नाकारली आहे. शिवसेनेने देखील पोलीस प्रशासनाला संपुर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवत मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

एवढेच नाही तर १५ मार्च रोजी शहारतील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा देखील रद्द करण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT