Mla-Sanjay-Shirsat
Mla-Sanjay-Shirsat 
छत्रपती संभाजीनगर

भाजप पळपुटी, कचऱ्याचा प्रश्‍न शिवसेना सोडवणारच- संजय सिरसाट

जगदीश पानसरे : सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : " शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावरून कुणीही राजकारण करू नये, हा कुठल्या एका पक्षाचा नाही तर शहरातील 15 लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न आहे. भाजपने नेहमी जनतेच्या प्रश्‍नावर पळपुटे धोरण स्वीकारले आहे, शिवसेना मात्र जनतेसाठी सदैव रस्त्यावर असते. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्‍न देखील शिवसेना लवकरच सोडवेल ," असा विश्‍वास शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केला. 

नारेगाव येथील कचरा डेपोत कचरा टाकण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढिग साचले आहे. सहा दिवसापासून कचरा पडून असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापौर आणि महापालिका प्रशासन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतांनाच आता या प्रश्‍नावरून राजकारण सुरू झाले आहे. 

भाजपने या प्रकरणातून अंग काढून घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी कठोर शब्दांत टिका केली. "कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे, त्यावर एकत्रितपणे निर्णय घेऊन कचरा कोंडीतून नागरिकांची सुटका लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. भाजपने पळपुटे पणाचे धोरण स्वीकारले असले तरी शिवसेना मात्र जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. येत्या आठवडाभरात कचऱ्याचा प्रश्‍न सुटलेला असेल ,"असा दावा संजय सिरसाट यांनी केला. 

कामयस्वरूपी व्यवस्था हवी 

महापालिकेने नक्षत्रवाडी, पैठण तालुक्‍यातील बाभुळगाव आणि चिकलठाण्यातील खाजगी जागेवर कचरा टाकण्याचा पर्याय निवडला होता. पण त्याला तुम्ही आणि संदीपान भुमरे यांनी विरोध केला? यावर देखील संजय सिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले. 
 

" कचऱ्यावर प्रकिया करणारा प्रकल्प उभा करण्यासाठी अद्याप महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केलेली नाही, प्लांट उभारायचा म्हटंल तर त्याला तीन महिने लागणार आहे. म्हणजेच तात्पुरत्या व्यवस्थेने हा प्रश्‍न सुटणार नाही. मुळात शहरातील कचरा ग्रामीण किंवा शहरालगतच्या भागात का म्हणून टाकायचा. तेथील लोकांचे आरोग्य महत्वाचे नाही का? या प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा निघावा या भावनेतूनच नक्षत्रवाडी येथे कचरा टाकण्यास मी विरोध दर्शवला होता."
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT