Patangrao Kadam
Patangrao Kadam  
छत्रपती संभाजीनगर

आणि  पतंगरावांमुळे चोवीस तासात गारपीटग्रस्तांना मदत मिळाली- अब्दुल  सत्तार

जगदीश पानसरे :सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : वेळप्रसंगी नियम बाजूला ठेवून मदत करण्याची आणि चालता बोलता तात्काळ निर्णय घेण्याची पतंगराव कदम यांची कार्यपद्धती होती. त्यामुळे राज्यातील गोरगरीबांचा फायदा झाल्याची आठवण सिल्लोड- सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितली.

2013 मध्ये सिल्लोड या माझ्या मतदारसंघात गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हा पतंगराव कदम पुनर्वसन मंत्री होते.  तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत औरंगाबाद येथे आले असताना पतंगराव यांनी आवर्जून तालुक्यातील खंडाळा येथे भेट दिली.

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून ते व्यथित झाले होते. आता मुख्यमंत्र्यांचे सचिव असलेले श्री. परदेशी तेव्हा पुनर्वसन खात्याचे सचिव होते. ते देखील पतंगराव यांच्या सोबत होते.

मदतीचा विषय निघाला तेव्हा पतंगराव यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले. तेंव्हा अधिकाऱ्यांनी नियमांचा पाढा वाचायला सुरुवात केली. मला नियम सांगू नका, शेतकरी अडचणीत आहे, त्याला मदतीची गरज आहे. 

 समुद्रातुन एक चमचा पाणी दिल्याने काही फरक पडणार नाही, आजच्या आज जीआर काढा असे आदेश पतंगराव कदम यांनी जागेवर संबंधित अधिकाऱ्यांना देत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी रुपयांची मदत दिली होती. सह्या वगैरे मी नंतर करेन असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.

कायम शब्द वगळला

शिक्षणमंत्री असतांना पतंगराव कदम यांनी कायम विना अनुदानित मधील कायम शब्द वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता, त्याचा फायदा राज्यातील लाखों  शिक्षकांना झाला.औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांनी अनेक निर्णय घेतले, कधी पक्षभेद केला नाही. शिक्षणमंत्री, पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप काम केले. शिक्षक ते शिक्षण सम्राट हा त्यांचा प्रवास त्यांनी आयुष्यात घेतलेल्या कष्टाचे प्रतीक आहे, अशा  शब्दांत अब्दुल सत्तार यांनी पतंगराव यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT