varpudkar-fad. 
छत्रपती संभाजीनगर

पाथरीत सुरेश वरपुडकर आणि  मोहन फड यांच्यात अस्तित्वाची लढाई  ?

गणेश पांडे

परभणी :  माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासाठी यंदाची निवडणुक ही अस्थित्वाची लढाईच म्हणावी लागेल. कारण मागच्यावेळी सुरेश वरपुडकर यांना या मतदार संघातून पराभवाचा सामना करावा लागला होता.

यंदा ते परत नशिब आजमावत आहेत. दुसरीकडे भाजपचे विद्यमान आमदार मोहन फड यांची यावेळी पाथरी व सोनपेठ मधून सत्वपरीक्षाच होती. यातून मतविभाजन व जातीय समिकरणात वरपुडकरांचे अस्थित्व की फड यांची आमदारकी टिकविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार मोहन फड व माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यात अटीतटीची आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत विजयाचे गणित लावणे कठीण आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार डॉ. जगदीश शिंदे यांनी चांगलाच जोर लावल्याने त्याचा फायदा कोणाला होतो हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पाथरी तालुक्यातून आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आघाडीचा धर्म पाळत वरपुडकरांचे काम केल्याने या तालुक्यातुन मताधिक्य मिळू शकते. परंतू हे मताधिक्य सोनपेठ तालुक्यातून कमी होण्याची शक्यता आहे. 


मोहन फड यांना मानवत तालुक्यातून मिळणारे मताधिक्य परभणी ग्रामीण मधूनही कमी होते का हे पाहणे औच्छुक्याचे ठरेल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसच्या सुरेश वरपूडकरांना जशी राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली. त्या प्रमाणात भाजपाचे उमेदवार मोहन फड यांना शिवसेनेकडून साथ मिळाली नसल्याचे दिसून आले. शिवसेना बंडखोर उमेदवार डॉ जगदिश शिंदे यांनी मी शिवसेनेचाच आहे असा प्रचार केला असला तरी त्यांच्या सोबत शिवसेनेचा एकही पदाधिकारी सोबत दिसला नाही. 


  वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेच्या निवडणुकीत असलेले आकर्षण विधानसभा निवडणुकीत राहिले नसल्याचे दिसून आले. तरीही प्रत्येक केंद्रावर विलास बाबर यांना चांगले मतदान होऊ शकते ही बाब काँग्रेससाठी धोक्याची ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT