youth congress protest aginst bjp news
youth congress protest aginst bjp news 
छत्रपती संभाजीनगर

` कहा गये बीस लाख करोड` युवक काॅंग्रेसचे भाजप कार्यालयावर आंदोलन

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः कोरोना संकटाच्या काळात देशाच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. पण या पॅकेजचा फायदा नेमका कुणाला मिळाला, कोणत्या क्षेत्राला मिळाला याबद्दल विरोधकांकडून सवाल केला जात आहे. महाराष्ट्र युवक काॅंग्रेसच्या वतीने आज राज्यात कहा गये बीस लाख करोड असे म्हणत आंदोलन करण्यात आले. औरंगाबादेत भाजप कार्यालायासमोर आंदोलन करणाऱ्या युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

देशभरात गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाचे संकट आहे. लोकांचे रोजगार बुडाले, मोठ्या प्रमाणावर कामगार, मजुरांचे आपापल्या राज्यात स्थलांतर झाले. उद्योग, व्यापार, व्यवसाय ठप्प झाल्याने गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर अनेकांच्या हातचे काम हिरावले गेले.

एकीकडे ही आर्थिक कोंडी तर दुसरीकडेे देशातील कोरोना रुग्णांचा आकडा २४ लाखांवर गेला आहे. ४८ हजारांहून अधिक बाधितांचा या महामारीने बळी घेतला. केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, पण हे पॅकेज कुठे दिसलेच नाही, असा आरोप काॅंग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून केला जातोय.

महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपुर्वी कहा गये वीस लाख करोड असा सवाल करत राज्यभरात भाजप सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानूसार आज राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये युवक काॅंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. औरंगाबादेत युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उस्मानपुरा येथील भाजप  विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरादार घोषणाबाजी केली. परंतु पोलिसांनी तात्काळ युवकक काॅंग्रेसच्या  कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भाजप कार्यालय, तसेच खासदारांच्या घरासमोर सोशल डिस्टन्सचे पालन करत फक्त चार जणांनी निदर्शने करावीत आणि वीस लाख कोटींच्या पॅकेजचा जाब विचारावा असे आवाहन प्रदेश युवक काॅंग्रेसच्या वतीने करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT