Uddhav Thakre
Uddhav Thakre 
छत्रपती संभाजीनगर

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच : उद्धव ठाकरे 

माधव सावरगावे

नांदेड / लातूर : शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ,लोहा, कंधारतालुक्यातील सहा  गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली . त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला . 


लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले, पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी आलेलो आहे.  आपल्या तालुक्यातून सुमारे 432 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे दुष्काळाची अनुदानासाठी पाठवलेला आहे . तो सरकारला हलवून मला मंजूर करून घ्यावा लागेल . त्यासाठी तुमची एकत्रित ताकद महत्त्वाची आहे. 


त्यावर काही शेतकरी म्हणले , आम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे . आम्हाला   संपूर्ण कर्जमाफी ही फक्त शिवसेना देऊ शकते . आताच्या सरकारने आम्हाला संपूर्ण कर्जमाफी दिलेली नाही . अद्याप  ८० टक्के कर्जमाफी मिळालेली नाही.  शिवसेनेचे सरकार आल्यावर ती कर्जमाफी मिळेल असे आम्हाला वाटते . त्यावर जमलेल्या शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . 


त्यावर उद्धव ठाकरे  हसून म्हणाले,  तुमची इच्छा असली तर आपले सरकार येईल.शिवसेनेचा मुख्यमंत्री  होणारच .आपले सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेईल . पण आता मी त्यासाठी येथे आलेलो नाही मी सरकार स्थापन करायचे असते तर मुंबईतच बसलो असतो . 


 तुमचे नुकसान झाले म्हणून मी आलेलो आहे आता तुम्ही आता हसलात  तर मला बरं वाटलं !तुम्ही जर दुःख करीत बसलात तर गेलेली थोडीच परत येणार आहे ? त्यापेक्षा आपण या संकटाचा सामना करु.  शिवसेना तुमच्या पाठीशी या संकटात उभी आहे ते सांगण्यासाठी मी आलेलो आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT