thKare-and-Tatya.jpg
thKare-and-Tatya.jpg 
छत्रपती संभाजीनगर

तानाजी सावंतांसाठी उध्दव ठाकरेंनी दोन्ही तात्यांना कामाला लावले

आनंद खर्डेकर

परांडाः शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील आणि शंकर बोरकर यांचा बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक असा उल्लेख करत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या दोघांनाही महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्यासाठी कामाला लागा असे आदेश नुकतेच दिले.

पाटील आणि बोरकर यांना "तात्या' नावाने ओळखले जाते, याचा खास उल्लेखही उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला होता. आता हे दोघेही कामाला लागल्यामुळे सावंत यांना आणखी बळ मिळाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची परांडा येथे सभा झाली. खास ठाकरी भाषेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतल्याने या सभेची चर्चा अजूनही सुरू आहे.

या सभेतील वैशिष्ट म्हणजे उध्दव ठाकरे यांनी व्यासपीठावरून माझी गाडी कोणी चालवयाची माहित आहे का? असा सवाल केला होता. तेव्हा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील उभे राहिले आणि त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पण त्याचवेळी ठाकरे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शंकर बोरकर यांना देखील पाटील यांच्यासोबत समोर बोलावले.

"हे बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक आहेत, अशा कडवट शिवसैनिकामुळेच मी पक्षप्रमुख आहे असा उल्लेख करतांनाच राज्यात सत्ता आल्यानंतर अशा निष्ठावान शिवसेना कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असा शब्द दिला होता.

माजी आमदार पाटील व बोरकर यांना "तात्या' म्हणतात असे सांगत दोन्ही "तात्यांना' महायुतीचे उमेदवार प्रा. सावंत यांना साथ द्यावी असे आवाहन देखील उध्दव ठाकरे यांनी या सभेत केले होते. त्यानंतर याची मतदारसंघाच चांगलीच चर्चा रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT