vaidynath bank chairman parali news
vaidynath bank chairman parali news 
छत्रपती संभाजीनगर

वैद्यनाथ सहकारी बॅंकेच्या अध्यक्षाला दहा लाखांची लाच घेतांना पकडले..

दत्ता देशमुख

बीड : बँकेच्या व्यापारी सभासदाला अडीच कोटी रुपयांचे सीसी (कॅश क्रेडीट) कर्ज मंजूर केल्यावर १५ लाख रुपयांची मागणी करुन दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष अशोक जैन यास सोमवारी (ता. १९) परळी येथील राहत्या घरी अटक करण्यात आली. औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. 

जिल्ह्यातील प्रमुख नागरी सहकारी बँकांपैकी एक म्हणून परळी येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँक ओळखली जाते. या बँकेच्या कळंब येथील सभासद व्यापाऱ्याला २०१८ मध्ये अडीच कोटी रुपयांचे कॅश क्रेडीट कर्ज मंजूर करण्यात आले. यासाठी बँकेचा अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन याने १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

२९ सप्टेंबरला लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीची औरंगाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पडताळणी केली. त्यातील दहा लाख रुपये सोमवारी व नंतर उर्वरित पाच लाख रुपये स्विकारण्याचे ठरले. त्यावरुन पथकाने सोमवारी अशोक जैन याच्या राहत्या घरी सापळा रचला. तक्रारदाराकडून दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना अशोक जैन यास रंगेहाथ पकडले.

एखाद्या प्रतिथयश बँकेच्या अध्यक्षाला लाच घेताना पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.  भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे या बँकेच्या संचालक आहेत. पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, पोलिस नायक  विजय बाम्हंदे, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, विलास चव्हाण, चागंदेव बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT