Vinayak Meter Alleges Fraud in Famers loan
Vinayak Meter Alleges Fraud in Famers loan 
छत्रपती संभाजीनगर

विनायक मेटेंचा आरोप बाँब : गटसचिवांकडून शेतकरी कर्जात चारशे कोटींवर अफरातफर

दत्ता देशमुख

बीड : शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत घेतलेले कर्जाची परतफेड केल्यानंतर गटसचिवांनी या रकमा जिल्हा बँकेकडे वर्गच केल्या नाहीत. यातून चारशे कोटींवर अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला. कर्ज भरलेल्या आणि कर्जही न घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर जिल्हा बँक सरकारची कर्जमाफी घेत असल्याचा आरोपही श्री. मेटे यांनी केला.

अशी अफरातफर करणाऱ्या सेवा सोसायट्यांची जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा बँकेने चौकशी करुन अफरातफर करणाऱ्या गटसचिवांवर फौजदारी दाखल करावी, अटक करुन पैसे भरुन घ्यावेत, संघटतीत गुन्हेगारीचा हा प्रकार असून तशी कलमे लावावीत, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. काही शेतकऱ्यांनी कर्ज भरले आणि काही शेतकऱ्यांनी कर्जच काढले नाही त्यांच्या बाबत हा प्रकार घडला असून यात शेतकरी अनभिज्ञ असल्याचे विनायक मेटे म्हणाले. 

बोगस पिक कर्ज तयार करणारी टोळीच असल्याचा आरोपही त्यांनी केला. गटसचिवांच्या वेतनासाठी जिल्हा बँकेला भेटलेल्या कर्जमाफी रकमेतून दोन टक्के रक्कम देण्यालाही त्यांनी विरोध केला. त्यांनी कर्जवसूलीऐवजी शेतकऱ्यांच्या रकमा घशात घातल्याने त्यांना रक्कम देणे चुक आहे. उलट त्यांना ही दोन टक्क्याने २५ कोटी रुपये रक्कम देण्यासाठी आग्रह धरणारे भाजप व राष्ट्रवादीचे नेतेही यात सामिल असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, लक्ष्मण ढवळे, अनिल घुमरे, नवनाथ प्रभाळे उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT