Vinayak_Mete
Vinayak_Mete 
छत्रपती संभाजीनगर

कुणी निंदा - कुणी वंदा ...  : विनायक मेटे

दत्ता देशमुख

बीड : 'गेली ३८ वर्षे मी समाजासाठी काम करत आहे, कधी यश मिळाले कधी अपयश. शेतकरी वडील असणारा मी विस्थापित चेहरा होतो आणि आजही आहे. मात्र, बहुजनासाठी काम करण्यासाठी राजकारण करत आहे. आज मराठा समाजासाठी झालेले वसतीगृह समाजाचे यश आहे.

आपण फक्त मागणीला पाठबळ दिले. मराठा समाजाचा हा प्रश्न सुटला असून भविष्यात मुस्लिम, धनगर व माळी समाजाच्या प्रश्नासाठी काम करणार असल्याचे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे म्हणाले. कुणी निंदा कुणी वंदा समाजसेवा हाच आपला धंदा, असेही ते म्हणाले.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह योजनेतून दोनशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या वसतीगृहाच्या उभारणीसाठी आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन निधी मिळविला. त्याचे उद॒घाटन बुधवारी झाले.

महादेव महाराज चाकरवाडीकर , शिवाजी महाराज नारायणगडकर, लक्ष्मण महाराज रामगडकर, दत्त संस्थानचे पवार महाराज, बेलेश्वर संस्थानचे महादेव महाराज, डोंगरे महाराज, प्रा. सुशीला मोराळे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सरचिटणीस सुदर्शन धांडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, योगेश शेळके, सभापती मनीषा ज्ञानेश्वर कोकाटे, भाजपचे नगरसेवक गुरखुदे, राहुल बनगर, सचिन कोठुळे, सुनील शिंदे, राजेंद्र आमटे, दत्ता गायकवाड, नवनाथ प्रभाळे आदींची उपस्थिती होती.

आमदार विनायक मेटे यांनी कायम गरिबांची सेवा केल्याने त्यांना संत महंतांचा आणि नारायण गडाच्या नगद नारायणचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असणार असल्याचे शिवाजी महाराज म्हधणाले. तर, आमदार विनायक मेटे बहुजनांचे पाणीदार नेते असल्याचे प्रा. सुशीला मोराळे म्हणाल्या. इतर समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह देखील मेटेच उभारतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या वसतीगृहामुळे समाजातील दोनशे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. या कामासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी विनायक मेटे यांचा सत्कार केला.  मंगेश पोकळे, सनदी लेखापाल भानुदास जाधव, डॉ. अंशुमन बहिर, कुंदा काळे, गणेश मस्के, डॉ. प्रमोद शिंदे, गणेश मोरे, सरपंच श्री. पवार उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT