we are ready to face corona situation says rahul patil
we are ready to face corona situation says rahul patil  
छत्रपती संभाजीनगर

आमदार राहुल पाटील म्हणतात, `परिस्थिती गंभीर; परंतु आम्ही खंबीर'

गणेश पांडे

परभणी ः कोरोना विषाणुचा संसर्ग पसरल्यानंतर देशात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या गंभीर परिस्थिती उदभवणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही प्रशासनाच्या नियमांचे पालन करून परभणी विधानसभा मतदारसंघात कोरोना विषाणुला प्रवेशच करू देणार नाही असा निर्धार परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केला.

देशावर आलेल्या संकटाच्यावेळी सर्वांनी एकजुट राहणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पूर्ण जबबादारीने पावले टाकत आहे. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. परंतू आपण सामाजिक जबाबदारी स्विकारून घराबाहेर न पडून शासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. अशा विपरित परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  सध्या राज्य शासनास रक्ताचा तुटवडा भासत आहे. तातडीच्या शस्त्रक्रियासाठी सातत्याने रक्ताची गरज भासत असल्यामुळे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून नियोजनबद्ध रक्तदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोमवारी (ता.30) नावंदर हॉस्पिटल व सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे हा उपक्रम घेण्यात आला. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह डॉ. विवेक नावंदर, डॉ. अनिता नावंदर यांनी रक्तदान केले.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, तहसिलदार विद्याचरण कडावकर, डॉ.विक्रम पाटील, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, महापालिका सदस्य सुशील कांबळे, युवासेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, अभय कुलकर्णी, तुषार चोभारकर, मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

14 एप्रिल पर्यंत उपक्रम चालणार
नियोजनबद्ध रक्तदानाचा हा उपक्रम मतदार संघात शहरी व ग्रामीण अशा दोन टप्यात ता.14 एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून "परिस्थिती गंभीर पण आम्ही परभणीकर खंबीर "हा संदेश या माध्यमातून राज्याला
देणार आहोत.
- डॉ.राहूल पाटील, आमदार परभणी
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT