prakash ambedkar
prakash ambedkar 
छत्रपती संभाजीनगर

एमआयएम सोबत अजूनही वंचित बहुजन आघाडीची युती !

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीकडे राज्यातील 17 विधानसभा मतदारसंघांची यादी पाठवली आहे. यावर आमची त्यांच्याशी प्राथमिक चर्चा सुरू होती. वंचित सोबतची आघाडी तोडल्याचे कुठलेही पत्र किंवा निरोप आम्हाला ओवेसी यांच्याकडून मिळालेला नाही.

त्यामुळे  एमआयएम सोबत अजूनही वंचित बहुजन आघाडीची युती असल्याचे  आम्ही मानतो असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारी समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

एमआयएमचे खासदार आणि  प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे वंचित सोबतची आघाडी तुटल्याचे जाहीर केले आहे.

त्यानंतर लगोलग वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील कार्यालयातून एक प्रसिध्दी पत्रक जारी करण्यात आले आहे.

कार्यकारी समितीचे रतन बनसोडे यांच्या सहीनिशी काढण्यात आलेल्या या पत्रात एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे दिलेल्या 17 जागांच्या यादीवर चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. वंचित सोबतची आघाडी तुटल्याचे अधिकृत पत्र किंवा निरोप एमआयएमचे सर्वेसर्वा अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून अद्याप आम्हाला आलेले नाही.

जोपर्यंत ते स्वःत याबाबत काही कळवत नाही, तोपर्यंत आमची एमआयएमशी युती कायम आहे असे आम्ही मानतो याचा पुनरूच्चार या प्रसिध्दी पत्रकात करण्यात आला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT