Beed Murder news
Beed Murder news 
छत्रपती संभाजीनगर

लग्न झालेले असतांना प्रियकराबरोबर गेली, त्यानेच घात करत संपवले..

दत्ता देशमुख

नेकनूर : पुणे येथे एकत्र राहणाऱ्या व दुचाकीवरुन गावाकडे परतत असताना वाटेतच प्रेयसिच्या अंगावर पेट्रोल व ॲसिड टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील येळंबाघाट येथे उघड झाली. या घटनेतील तरुणीचा उपचारादरम्यान रविवारी (ता. १५) मृत्यू झाला. जखमी तरुणी दहा तासांहून अधिक काळ जागेवरच विव्हळत पडलेली होती. 

सावित्रा डिंगबर अंकूरवर (वय २२, रा. शेळगाव, ता. देगलुर, जि. नांदेड) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर अविनाश रामकीसन राजुरे (वय २५) असे आरोपीचे नाव असून तो मृत तरुणीच्या गावातीलच आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील सावित्रा अंकुरवार आदीवासी समाजातील विवाहित होती. मात्र, तीचे व अविनाश राजूरे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच ती घर सोडून अविनाश सोबत गेली. मागच्या वर्षभरापासून पुण्यात ते एकत्र राहत होते. 

शुक्रवारी (ता. १३) दोघेही पुण्याहुन दुचाकीवरुन गावी निघाले. उशिर झाल्याने तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात एका खडी क्रेशर जवळ दोघेही मुक्कामास थांबले. शनिवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास अविनाश राजूरे याने सावित्री अंकुरवार हिचा गळा दाबून तिच्या अंगावर अॅसीड व नंतर पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि तो पसार झाला. 

शनिवारी दुपारी नेकनूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्‍मण केंद्रे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन जखमी तरुणीला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी तरुणीच्या जबाबावरुन सुरुवातीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, दरम्यान, रविवारी सकाळी साडेअकरा वाजता या तरुणीचा मृत्यू झाला. फौजदार विलास जाधव पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारात अविनाश राजूरे याने सावित्री अंकुरवार हिला ॲसिड व पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि पळ काढला. रस्त्याच्या काही अंतरावर खडी क्रेशर येथे ही घटना घडली. त्यामुळे लोकांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. विव्हळत असलेल्या या तरुणीचा आवाजही रस्त्यापर्यंत पोचत नव्हता. शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना लक्षात आली. तोपर्यंत तरुणी विव्हळतच पडलेली होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT