Whole Kshirsagar Family in Quarantine
Whole Kshirsagar Family in Quarantine 
छत्रपती संभाजीनगर

काकांमुळे संदीप क्षीरसागरांनाही व्हावे लागले 'होम क्वारंटाईन'

दत्ता देशमुख

बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बाहेरुन आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्याची मागणी संदीप क्षीरसागर गटाच्या नगरसेवकांनी केली. त्यांना होम क्वारंटाईन केल्याने संपूर्ण क्षीरसागर कुटुंबालाच होम क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे आता आमदार संदीप क्षीरसागरही होम क्वारंटाईन आहेत. चालकांनाही होम क्वारंटाईन केल्याने आता या दोघांसह या घरातील प्रत्येकाला या बंगल्यातूनच कारभार हाकावा लागणार आहे.

दोन दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर बाहेरुन शहरात आले. त्यांना होम क्वारंटाईन करण्यासह त्यांनी संचारबंदीचे उल्लंघन करुन शहरात कसे आले याची चौकशी करण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर गटाच्या नगरसेवकांनी केली होती. दरम्यान, याच काळात प्रशासनाने जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वारंटाईन केले. दरम्यान, आपण रितसर परवानगी घेऊन आल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगीतले. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वारंटाईन केल्याने आमदार संदीप क्षीरसागरांनाही होम क्वारंटाईन करावे लागले.

संदीप क्षीरसागर यांनीच फेसबूकवर दिली माहिती

कारण, जयदत्त क्षीरसागर व संदीप क्षीरसागर नगर रोडवरील एकाच बंगल्यात राहतात. मंगळवारी जिल्हाधिकारी राहQल रेखावार यांनी या इमारतीत राहणाऱ्या सर्वच व्यक्ती होम क्वारंटाईन केल्याचे पत्रच संदीप क्षीरसागर यांना धाडले. खुद्द संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हे पत्र पोस्ट करुन याची माहिती दिली.

एकाच इमारतीत अनेक मान्यवर

दरम्यान, याच इमारतीत बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांचे बंधू व शहराचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक योगेश क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष व प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर या सर्वांसह त्यांच्या चालकांनाही होम क्वारंटाईनच्या सुचना आहेत. एकूणच या बंगल्यात एक आमदार, एक माजी मंत्री, उपनगराध्यक्ष, नगरसेवक अशा विविध जबाबादाऱ्या असणारी मंडळी आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन केल्याने त्यांना बंगल्यातूनच कारभार हाकावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT