Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Cabinet : आरोप, डाग असलेल्यांना मंत्रीपद का द्यावे... संभाजीराजेंचा सवाल

Umesh Bambare-Patil

संभाजीनगर : आरोप, डाग असलेल्या आमदारांना मंत्रीपदे का द्यावीत, असा प्रश्न उपस्थित करून चांगले काम करणारे व सुसंस्कृत आमदार आहेत, त्यांना मंत्रीपदे द्यावीत. मंत्रीमंडळाचे कौतूक होण्यापेक्षा याला का दिले त्याला का दिले याचीच चर्चा झाली, अशी खंत कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

संभाजीनगर येथे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नव्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर आक्षेप घेतला जात आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले, मुळात याविषयी मुख्यमंत्र्यानी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी उत्तर देणे गरजेचे आहे. पण, मंत्र्यांवर आरोप होत असेल तर त्यांना मंत्रीपद का द्यावे. चांगले काम करणारे आमदार आहेत. चांगल्या माणसांना मंत्रीपदे देणे गरजेचे आहे.

पण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी सांगून उपयोग नाही. आरोप, डाग असेल अशी लोक मंत्रीमंडळात का घ्यावीत. सुसंस्कृत आमदारांची संख्याही मोठी आहे. त्यांना त्यांनी संधी द्यायला हवी ही आमची इच्छा आहे. पण, मंत्रीमंडळ स्थापन होत असताना त्यांचे कौतूक होण्याऐवजी याला कशाला दिले, त्याला कशाला दिले हीच लाईन पहायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT