Imtiaz Jalil-Prakash Ambedkar
Imtiaz Jalil-Prakash Ambedkar 
छत्रपती संभाजीनगर

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदर कायम राहील- इम्तियाज जलील

जगदीश पानसरे

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीसोबत असलेली एमआयएमची युती संपुष्टात आली आहे. आमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित सोबतची आघाडी तुटली असली तरी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यांबद्दल जो आदर माझ्या व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तो यापुढे देखील कायम राहील, तो तसूभरही कमी होणार नाही, असे सांगत खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना 'सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केल्या व्यक्त केल्या.

वंचित बहुजन आघाडी सोबतची युती संपुष्टात आल्याची अधिकृत घोषणा तीन दिवसांपुर्वी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्दी पत्रक काढून केली होती. त्यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही फक्त ओवेसी यांच्यांशी बोलू, ते जोपर्यंत युती तुटल्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत आम्ही एकत्रित आहोत, असे सांगितले होते. या परस्पर विरोधी विधानांमुळे दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण होते. प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील यांच्याबद्दल अपशब्द काढत एका चॅनलवर त्यांच्या अपमान केला होता.

या संदर्भात इम्तियाज जलील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ''प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. केवळ मीच नाही तर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना देखील तो आहे, आणि यापुढेही कायम राहील. त्यांनी माझ्या विरोधात जे काही विधान केले ते रागाच्या भरात केले असावे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थीती आघाडीच्या चर्चा यामुळे त्यांच्यावर प्रचंड ताण आहे, अशात त्यांनी जर माझ्याबद्दल काही विधान केले असेल तर त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही.''

''सोशल मिडियाच्या माध्यमातूनच मी ते ऐकले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असणे सहाजिक आहे. पण एमआयएमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील मी सूचना दिल्या आहेत, प्रकाश आंबेडकरांच्या विधानवर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा त्यांचा अनादर होईल असे कृत्य करू नये. ते माझ्यासाठी आदरणीय आहेत, आघाडी तुटली तरी आदरणीयच राहतील,'' इम्तियाज शेवटी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT