Jalgav-commissionar-dange
Jalgav-commissionar-dange 
बदल्या / नियुक्ती

जळगाव महापालिका आयुक्तपदी सी.के.डांगे 

सरकारनामा ब्युरो

जळगाव : जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी चंद्रकांत कृष्णा (सी.के.) डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.प्रवीण गेडाम यांच्यानंतर दुसरे आय.ए.एस. अधिकारी असतील. 

जळगाव महापालिकेचे आयुक्त संजय कापडणीस यांची बदली झाल्यानंतर एक वर्षापासून आयुक्तपद रिक्त होते. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर प्रभारी आयुक्तपदी काम पाहत होते. रिक्त असलेल्या आयुक्तपदावर सी.के.डांगे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्यसचिव मुकेश खुल्लर यांनी जारी केले आहेत.

श्री डांगे हे ठाणे येथील आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते. ते2010च्या आय.ए.एस. बॅचचे अधिकारी आहेत. नागपूर हे त्यांचे मूळ गाव असून तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे. आय.आय.टी.खरगपूर येथून त्यांनी एम.टेकची पदवी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे सहाय्यक संचालक पदी काम पाहिले आहे. 

जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत आता संपलेली आहे. येत्या ऑक्‍टोबरमध्ये निवडणूका होण्याची शक्‍यता आहे. प्रभाग रचना झाली असून पक्षीय पातळीवर निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन आयुक्त सी.के.डांगे यांच्या देखरेखीखाली या निवडणूका होतील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT