Nitesh Rane News Sarkarnama
ब्लॉग

Solapur CP: भाजप आमदारांवर गुन्हा दाखल करणं सीपींना भोवलं; फडणवीसांकडून उचलबांगडी?

सरकारनामा ब्यूरो

डॉ. राहुल रनाळकर

Nashik:आमदार नीतेश राणे आणि राजा भैया यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये "जन आक्रोश मोर्चा"चे आयोजन केले होते. यासंदर्भात तत्कालीन सोलापूर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी राणे यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. काही कार्यकर्त्यांच्या अंगावर जखमा व वळ उमटेपर्यंत मारहाण केल्याची तक्रार पुढे आली. याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली. याच प्रकरणामुळे आयुक्तांची बदली होऊन ते नाशिक मुक्कामी पाठवल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नुकतेच राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. त्यात सोलापूर पोलीस आयुक्तांना नाशिकमधील पोलिस अकादमीमध्ये धाडण्यात आले. डॉ. माने यांना साईड ब्रँच देण्यामागे आमदार राणेंवरील कारवाई असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

सोलापुरमधील मोर्चामध्ये सहभागी असलेल्यांनी डॉ. माने यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड संताप व्यक्त केला होता. तसा संदेश देखील वरिष्ठ स्तरावर पोहोचण्यात आला. डॉ. माने यांची उचलबांगडी करीत त्यांच्या जागी जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार हे पदोन्नतीने बदलून आले आहेत. तर डॉ. माने यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सहसंचालकपदी दाखल झाले.

काही दिवसापूर्वी शनिवारी सोलापूरात हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आ. नितेश राणे व तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह ठाकूर यांच्यासह आठ ते दहाजणांविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा कन्ना चौकाच्या दिशेने निघाला होता. सायंकाळी 7 वाजता कन्ना चौकात मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. सभेदरम्यान आमदार नीतेश राणे व तेलंगणाचे आमदार टी.राजा सिंह ठाकूर यांनी भाषण केले.

दोघांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवून गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून की काय? नुकतेच महाराष्ट्रातील वरिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीमध्ये देखील डॉ. माने यांचा समावेश करण्यात आल्याने त्यांची एकप्रकारे उचल बांगडी केल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT