Maharashtra Politics Live Update Sarkarnama
ब्लॉग

Maharashtra Politics Updates: विलेपार्ले पूर्वेकडील जैन मंदिरावरील तोडक कारवाई योग्यच - हायकोर्ट

Maharashtra Politics Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय व प्रशासकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर.

Amit Ujagare

Mumbai Live : विलेपार्ले पूर्वेकडील जैन मंदिरावरील तोडक कारवाई योग्यच - हायकोर्ट

मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर महापालिकेकडून करण्यात आलेली तोडक कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

महापालिकेच्या के पूर्व प्रभाग कार्यालयाची बाजू न्यायालयाने उचलून धरल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सर्व इंजिनियर्स संघटना आक्रमक झाल्या असून मुनिसिपल इंजिनियर्स संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांनी थेट सरकारमधील मंत्री असलेल्या मंगल प्रभात लोढा यांच्या राजीनाम्याच्या मागणी सोबतच त्यांची आमदारकी रद्द करण्याची ही मागणी केली आहे.

Mumbai Live : राज्य सरकार सर्वच विकासात्मक धोरणावर अपयशी - दानवे

मुंबई - राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची ढासळलेली परिस्थिती, वैद्यकीय शिक्षणात विभागात अनागोंदी, जल जीवन मिशन योजनेचा अपुरा निधी, सामान्य प्रशासनाचा भोंगळ कारभार, उद्योग विभागातील भ्रष्टाचार आदी विकासात्मक धोरणावर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकारच्या एकूणच कारभारावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

आदिवासी कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि पाणी पुरवठा विभागावर विरोधी पक्षाने आणलेल्या २६० च्या प्रस्तावार आज सभागृहात दानवे यांनी भूमिका मांडत राज्यात विकास योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Pune Live : वृद्ध महिलेचे घर ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ

मंचर : "घर तेच, पण आता जागा मोकळी", असा अनुभव मंचरमधील ८० वर्षांच्या शकुंतला शिवाजी बागल यांना आला आहे. मागील वर्षभर उपचारासाठी मुलीकडे गेलेल्या या वृद्ध महिलेला मंचरला परत आल्यावर आपले घरच गायब झाल्याचा धक्का बसला आहे. या संदर्भात घर चोरीला गेल्याचं निवेदन बागल यांनी मंचर पोलिस ठाण्यात व मंचर नगरपंचायतील दिले आहे.

Sambhaji Nagar Live : संजय शिरसाटांकडं कोट्यवधींची प्रॉपर्टी घेण्यासाठी पैसे आले कुठून? - इम्तियाज जलील

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याविषयावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

जलील म्हणाले, "मला यात काही आश्चर्य वाटलं नाही. कोट्यवधीची प्रॉपर्टी घेण्यासाठी पैसे कुठून आले? आज मला दिसलं की पैसे बेडरूम मधून आले. पण काहीही होत नाही. सरकार म्हणत असेल की तुम्हीही खा आम्हीही खातो. घरका भेदी कोण आहे याचा शोध घेण्याचे काम हे शिरसाट आहे. तर हा पैसे कुठून आला हे तपासण्याचे काम तपास यंत्रणांचे आहे.

माझ्या तक्रारीची खूप लाईटली दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमेवर प्रश्नचिन्ह येऊ लागले आहे. इतके भ्रष्टाचार पुरावे देऊन शांत का बसत आहेत? असा प्रश्न लोक विचारत आहेत. आता लोक एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारात नाहीत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारत आहेत की तुम्ही शांत का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT