Raj Kundra  File Photo
ताज्या बातम्या

अखेर दोन महिन्यांनंतर राज कुंद्राने टाकलं तुरुंगाबाहेर पाऊल अन्...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. कुंद्रा याला न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर अखेर त्याची दोन महिन्यांनंतर काराग़हातून सुटका झाली आहे. कारागृहातून बाहेर पाऊल टाकताच भावनिक झालेल्या राजला अश्रू आवरता आले नाहीत.

कुंद्राला दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी १ हजार ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून, तपासही पूर्ण झाला आहे, त्यामुळे जामीन मिळावा, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली होती. अखेर न्यायालयाने त्याला जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यानंतर तब्बल दोन महिन्यांनी तो कारागृहातून आज सकाळी सुटला. त्याला नेण्यासाठी शिल्पाचा कर्मचारी रवी हा आला होता. रवी त्याच्यासोबत राजचे कपडेही घेऊन गेला होता. कपडे बदलून कपाळाला टिळा लावून राज बाहेर आला. बाहेर आल्यानंतर अतिशय भावनिक झालेल्या राजला अश्रू आवरता आले नाहीत. तो माध्यमांशी काही न बोलता तेथून निघून गेला.

कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला सुरवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे.

या प्रकरणात कुंद्रा हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या बँक खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते. हॉटशॉट ॲप्सद्वारे हा प्रकार चालविला जात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT