नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. याचवेळी भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचाही इन्कार केला आहे. पक्षाचे प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांनी मात्र, कॅप्टन यांच्यावर कुणाचा तरी दबाव असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यामुळे रावत यांच्या रोख भाजप आणि अमित शहांकडे आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रावत म्हणाले की, कॅप्टन हे काँग्रेसमध्ये अपमान झाला असे म्हणत आहेत. परंतु, त्यांना पक्षाने कायम सन्मान दिला असून, त्यांचा आदर राखण्यात आला आहे. त्यांच्यावर काहीतरी दबाव असल्याचे दिसत आहे. गेली अनेक वर्षे पंजाब काँग्रेसमध्ये ते आघाडीवरील चेहरा होते. पक्षाने कायम त्यांच्या नेतृत्वाचा आदर राखला. आता पक्षाने निर्णय घेतल्यानंतर त्यांनी त्या बाजूने उभे राहायला हवे होते. भारत आणि लोकशाही वाचवण्याचा विषय येतो तेव्हा अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधींच्या समवेत या कठीण काळात उभे राहायला हवे होते.
कॅप्टन यांनी 29 सप्टेंबरला दिल्लीत अमित शहांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली होती. नंतर कॅप्टन शहांच्या निवासस्थानातून बाहेर पडले होते. लवकरच कॅप्टन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल, असेही बोलले जात आहे.
कॅप्टन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुढील वाटचालीचे संकेत दिले होते. त्यांनी काँग्रेस अथवा भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते की, सध्या मी काँग्रेसमध्ये आहे. मला योग्य वागणूक देण्यात आली नाही. मी काँग्रेस सोडणार आहे पण भाजपमध्ये जाणार नाही. माझ्यावर विश्वासच नसेल अशा पक्षात मी का राहावे? आतापर्यंत पक्षाने माझा खूप अपमान केला आहे. यापुढे मी अपमान सहन करणार नाही. सोनिया गांधींनी सांगितले म्हणून मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता पुढील निर्णय मी घेणार आहे.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.