Congress and BJP  File Photo
ताज्या बातम्या

भाजपचे आमदार काँग्रेसच्या संपर्कात? यावर प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

भाजपचे काही आमदार हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. यामागे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा यांचा हात असल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. यामुळे भाजपमधील (BJP) मतभेद समोर येत असून, अनेक नेते नाराज आहेत. यातच भाजपचे काही आमदार हे काँग्रेसच्या (Congress) संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. यामागे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) यांचा हात असल्याचीही चर्चा आहे.

भाजपचे अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत विचारणा केली असता शिवकुमार म्हणाले की, मी आमची रणनीची उघड का करावी? मी आमची रणनीती जाहीर करणार नाही. कोण कोणासोबत आहे आणि कोण कुणाकडे जाणार हे लवकरच कळेल. येडियुरप्पा काही तरी म्हणाले आणि नंतर त्यावर अशोक बोलले. त्यामुळे काही काळ थांबा तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पक्षात येणाऱ्यांचे स्वागतच असेल, अशी भूमिका घेतली आहे. कुणाला जर स्वत:हून पक्षात यायची इच्छा असेल तर त्यांना सामावून घेतले जाईल, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

याबाबत येडियुरप्पा म्हणाले होते की, काँग्रेसकडून निश्चितपणे असे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, काँग्रेसचे अनेक आमदारही आमच्या संपर्कात आहेत. ते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. ते कोण आहेत हे लवकरच तुम्हाला कळेल. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार अथवा इतर कुणाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप 140 जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल.

पक्षाच्या कार्यकारिणीत बोलताना महसूलमंत्री आर.अशोक म्हणाले होते की, अनेक पक्षांतील नेते भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. याबाबत राज्य भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे परवानगी मागितली आहे. केंद्रीय नेतृत्वाचा हिरवा कंदील मिळताच अनेक पक्षांमधील नेते हे भाजपमध्ये दाखल होतील. पक्षात दाखल होणाऱ्या नेत्यांची यादीही आम्ही केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे.

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT