PM Narendra Modi Speech On Lal Killa :
PM Narendra Modi Speech On Lal Killa :  Sarkarnama
देश

Narendra Modi Speech : 1 हजार वर्षांची गुलामी अन् पुढील हजार वर्षांची भव्यता, दोन्हीमध्ये भारत उभा ; नरेंद्र मोदी

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्या दिनानिमित्त लाल किल्ल्यावर भारतीय ध्वज तिरंगा फडकवण्यात आला. यानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशवासीयांना संबोधित केले. मोदी म्हणाले, "मणिपूरमध्ये (Manipur Violence) आता शांतता आहे. आज देशातील तरुण जे काही करतील, त्याचा देशावर 1000 वर्षे प्रभाव पडेल. युवाशक्तीमध्ये क्षमता असून ती मजबूत करण्याची आमची धोरणे आहेत."

मोदी म्हणाले, "1 हजार वर्षांची गुलामगिरी आणि पुढील 1 हजार वर्षांची भव्यता यांच्यामध्ये भारत उभा आहे. आज जी कथा लिहिली जाईल, ती पुढील 1 हजार वर्षांचा पाया असणार आहे. त्यांना बळ देण्याची आमची धोरणे आहेत. भारताची युवा शक्ती पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. भारत तंत्रज्ञानाच्या जगात मोठी शक्ती बनला आहे भारताच्या डिजिटल इंडियाच्या यशाबद्दल संपूर्ण जग आमचे कौतुक करत आहे."

मोदी पुढे म्हणाले, "हजारो वर्षांपूर्वी जेव्हा भारताच्या एका छोट्या राजावर कोणी हल्ला केला, तेव्हा संपूर्ण देशाला त्रास सहन करावा लागला. मी हजार वर्षांपूर्वींचा संदर्भ देत आहे, कारण पुन्हा आपल्याकडे संधी आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतकालचे हे पहिले वर्ष आहे. हा काळ आपण तारुण्यात जगत आहोत."

"या काळात आम्ही जी काही पावले उचलू, जितका अधिक त्याग आणि तपश्चर्या कराल, एकामागून एक निर्णय घेऊ. देशाचा येत्या एक हजार वर्षांचा सुवर्ण इतिहास त्यातून अंकुरणार ​​आहे. या काळात घडणाऱ्या घटना एक हजार वर्षे जगासाठी प्रभावी राहतील," असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT