Chhattisgarh Naxal Attack Sarkarnama
देश

Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 10 जवान शहीद

Dantewada Naxal Attack : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Chhattisgarh : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडीच्या स्फोटात 10 जवान शहीद झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दंतेवाडा येथे अद्यापही पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच असून आणखी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत. या स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला आहे.

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्डच्या जवानांवर हल्ला केला आहे. या आयईडी ब्लास्टमध्ये तब्बल 10 जवान शहीद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, एकाही नक्षलवाद्याला सोडलं जाणार नाही. ही घटना अत्यंत दु:खद आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची आमची लढाई अंतिम टप्प्यात असल्याची प्रतिक्रिया या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT