Sanjay Raut
Sanjay Raut  twitter/@ANIhindinews
देश

भाजपचे आणखी १० मंत्री देणार राजीनामा?

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) या तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपला गळती लागल्याचे दिसू लागले आहे. गेल्या तीन दिवसांत भाजपच्या तीन मंत्र्यांनी तर ११ आमदारांनी भाजपला रामराम ठोकला आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक भाकित केले आहे. ''राजीनाम्यांचा आकडा वाढतच जाईल, ही फक्त सुरुवात आहे, आणखी 10 मंत्री राजीनामा देऊ शकतात. तुमचे मंत्रीच राजीनामा देत असतील तेव्हा वारा कोणत्या दिशेने वाहत आहे, ते समजून येते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी 11 जानेवारीला राजीनामा दिल्यानंतर चार आमदारांनी पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर 12 जानेवारीला आणखी एक बडे मंत्री दारासिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनी पक्षावर राजीनामा बॉम्ब टाकला. चौहान हे भाजप ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

त्यानंतर आज मौर्य यांचेच समर्थक आमदार मुकेश वर्मा (Mukesh Verma) यांनीही राजीनामा दिला आहे. यानंतर काही वेळातच मंत्री धरमसिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे. सैनी हे आयुषमंत्री होते. त्यांनी सरकारी सुरक्षेसह सरकारी निवासस्थानही सोडले आहे. सैनी हे स्वामीप्रसाद मौर्य यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपचे आणखी आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

दरम्यान, गुरुवारी राजीनाम्यांचे सत्र सुरूच होते. फिरोजाबादच्या शिकोहाबाद मतदारसंघाचे आमदार डॉ. मुकेश वर्मा यांनीही पक्ष सोडला. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच औरैया येथील विधुना विधानसभेतील भाजप आमदार विनय शाक्य यांनीही राजीनामा दिला. लखीमपूर खेरीचे आमदार बालाप्रसाद अवस्थीही अखिलेश यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले.

बदायूंमधील बिलसीचे भाजप आमदार आरके शर्मा, सीतापूरचे आमदार राकेश राठौर आणि खलीलाबादचे आमदार जय चौबे हेही सपा बनले आहेत. बहराइचमधील नानपारा येथील आमदार माधुरी वर्मा यांनीही भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. ज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT