100 core vaccination  Twitter
देश

वॅक्सिन सर्टिफिकेटनंतर आता विमानावरही झळकला पंतप्रधान मोदींचा फोटो...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारताने आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण केला आहे.

ऋषीकेश नळगुणे

नवी दिल्ली : भारतात जानेवारीपासून सुरु झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने आज १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता, भारताने लसीकरणामध्ये गाठलेला हा टप्पा महत्वपूर्ण बाब मानली जात आहे. या विक्रमानिमीत्ताने दिल्लीमध्ये ग्रँड सेलिब्रेशन करण्यात येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये जावून त्यांनी उपस्थित आरोग्य सेविक आणि लस लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थंब दाखवत सर्व आरोग्य सेवकांचे कौतुक केले. तसेच याच लसीकरणाच्या टप्प्याचा भाग म्हणून आज देशातला सर्वात लांब तिरंगा लाल किल्ल्यासमोर ठेवण्यात आला आहे. या तिरंग्याची लांबी २२५ बाय १५० फूट अशी आहे.

यासोबतच आता या अनोख्या विक्रमानिमित्त आज स्पाइस जेटने (Spice jet) एका विमानाचे लोकार्पण केले. या विमानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यांचा फोटो दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेतील १०० कोटींचा महत्वाचा टप्पा ओलांडल्याबद्दल आम्ही आनंद साजरा करत असल्याचे म्हणत या स्पाइस जेटने या विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत. स्पाइस जेटने शेअर केलेल्या फोटोंमध्ये विमानावर पंतप्रधान मोदींबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांचेही फोटो असल्याचे दिसून येत आहे. निळ्या रंगामध्ये हे फोटो असून त्यावर १०० कोटी विजयाच्या लसी अशा अर्थाचा संदेश लिहून भारताचे अभिनंदन असेही म्हटले आहे. बोईंग ७३७ प्रकारचे हे विमान आहे. स्पाइस जेटच्या या विशेष सोहळ्यातील काही फोटो त्यांनी सोशल मिडीयावरुन शेअर केले आहेत.

100 core vaccination

१३० कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश, पंतप्रधानांची प्रतिक्रिया :

लसीकरणाच्या या विक्रमावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "२१ ऑक्टोबर २०२१ या दिवसाची इतिहासात नोंद ठेवली जाईल. १०० कोटी डोस देऊन भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोविड १९ विरोधात आज १०० कोटी भारतीयांना लसीकरणाच्या माध्यमातून सुरक्षा कवच लाभले आहे. भारतीय विज्ञान आणि १३० कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे. लस उत्पादक, आरोग्य सेवक आणि लसीकरण कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो", असेही मोदी म्हणाले.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण केला आहे. भारताच्या इतिहासात 'सुवर्णदिन' म्हणून या दिवसाची नोंद होईल. ९ महिन्यात भारताने ही ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली आहे. मी प्रत्येकाला शुभेच्छा देतो" असे म्हणत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर WHOचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसेस यांनीही ट्विट करुन भारताचे कौतुक केले आहे. घेब्रेसेस म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, वैज्ञानिक, आरोग्य कर्मचारी आणि भारताचे नागरिक ज्यांनी मोठ्या प्रमाणावरील लोकांना कोरोनाच्या धोक्यापासून सुरक्षित केल्याबद्दल तसेच लस समानतेचं लक्ष्य गाठल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT