modi-sitaraman.
modi-sitaraman. 
देश

कारवाईचा बडगा: कस्टम आणि एक्साईझचे 15 भ्रष्ट उच्चपदस्थ अधिकारी निलंबित

पीटीआय

नवी दिल्ली: भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा ठपका ठेवत केंद्र सरकारने सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क विभागातील मुख्य आयुक्त,  आयुक्त, अतिरिक्त आयुक्त  दर्जाच्या 15 वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज तडकाफडकी निलंबित केले. 

अर्थमंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सच्या नियम 56- अ नुसार अधिकाऱ्यांवरील कारवाईचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागातील 12 मोठ्या अधिकाऱ्यांकडून राजीनामे घेतले होते. निलंबन कारवाईत मुख्य आयुक्त दर्जा असणाऱ्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. विविध तपास संस्थांकडून मिळालेला अहवाल आणि शिफारशींच्या आधारे सरकारने निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला. 

या कारवाईत मुख्य आयुक्त, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कामकाजात खराब कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची सरकारने यादी तयार केली असून, त्यानुसार कारवाई केली जात असल्याचे सूत्राने म्हटले आहे. मुख्य आयुक्त डॉ. अनुप श्रीवास्तव, आयुक्त अतुल दीक्षित, संसार चंद, जी. श्री. हर्षा आणि विनय ब्रिजसिंह यांना सरकारने घरी पाठविले आहे. उपायुक्त अमरेश जैन, अशोक कुमार असवाल, ज्वाइंट कमिशनर नानिल कुमार, सहायक आयुक्त एस. एस. पबाना, एस. एस. बिस्त, विनोदकुमार सांगा, मोहंमद अल्ताफ यांच्यावरही कारवाई झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT