New Delhi Railway Station Stampede Sarkarnama
देश

New Delhi Railway Station stampede : 400 जागांसाठी दर तासाला 1500 तिकिटांची विक्री...; नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीचं धक्कादायक कारण आलं समोर

New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत कुंभमेळ्यासाठी निघालेल्या 18 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मात्र, ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

Jagdish Patil

New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत (New Delhi Stampede) कुंभमेळ्यासाठी निघालेल्या 18 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मात्र, ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

दिल्ली पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर प्रवशांनी मोठ्या प्रमाणात गर् केली होती. त्यातच स्वतंत्रा सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी या दोन्ही गाड्या उशीरा धावत होत्या. या गाड्यांची वाट पाहणारे सर् प्रवासी 12,13 आणि 14 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उभे होते.

400 जागांसाठी 1500 तिकिटांची विक्री

यावेळी गाडी येताच प्रवाशांनी चढण्याचा प्रयत्न केला असता 14 आणि 16 प्लॅटफॉर्म क्रमांक जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली. धक्कादायक बाब म्हणजे 400 जागांसाठी रेल्वेने (Railway) दर तासाला 1500 जनरल तिकटांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळेच गर्दी अनियंत्रित झाली आणि ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेला जबाबदार कोण? आणि 400 जागांसाठी रेल्वेने दर तासाला 1500 तिकीटांची विक्री का केली? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू

दरम्यान, नुकतंच मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये 30 भाविकांचा मृत्यू झाला होता. अशातच आता नवी दिल्लीतील घटनेत 18 भाविकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी काही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची नावे -

आहा देवी (बिहार) वय ७९ वर्षे, पिंकी देवी (दिल्ली) वय ४१ वर्षे, शीला देवी (दिल्ली) वय ५० वर्षे, व्योम (दिल्ली) वय २५ वर्षे, पूनम देवी (बिहार) वय ४० वर्षे, ललिता देवी (बिहार) वय ३५ वर्षे, सुरुची शाह (मुजफ्फरपूर, बिहार) वय ११ वर्षे, कृष्णा देवी, (बिहार) वय ४० वर्षे, विजय साह (बिहार) वय १५ वर्षे, नीरज पासवान (बिहार) वय १२ वर्षे, शांती देवी, (बिहार) वय ४० वर्षे, पूजा कुमार (बिहार)वय ८ वर्षे, संगीता मलिक, (हरियाणा) वय ३४ वर्षे, पूनम सिंग वय ३४ वर्षे तर ममता झा (४०) रिया सिंग (७), बेबी कुमारी (२४) पंचदेव कुशवाह (४७) हे सर्व राहणार दिल्ली अशी या मृतांची नावे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT