New Parliament Inauguration News : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटना वरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे.
यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह 19 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. मात्र, उद्घाटन कार्यक्रमात इतर अनेक विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.
माजी केंद्रीय मंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), शिरोमणी अकाली दल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षाने बुधवारी (24 मे) संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची घोषणा केली आहे. तसचे बीजेडी, अपना दल, एजेएसयू, एआयडीएमके, एआययूडीएफ, जेडीएस, मिझो नॅशनल पार्टी, नाना पीपल्स फ्रंट, एनडीपीपी, आरएसली, आणि एसकेएमचे खासदार सहभागी होणार आहेत.
दरम्यान, बहिष्कार टाकलेल्या पक्षांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड), मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता पक्ष यांचा समावेश आहे.
तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणी), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथाईगल काची, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK) आणि राष्ट्रीय लोक दल यांनी बहिष्काराची घोषणा केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. बीआरएस गुरुवारी (२५ मे) उद्घाटन समारंभाला उपस्थित राहायचे की नाही याचा निर्णय घेणार आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.