देश

Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेशात "लाडली बहनाने" "मामांना" तारलं, शिवराज सिंह पुन्हा मुख्यमंत्री ? 

Madhya Pradesh Assembly Election 2023 Result in Marathi: शिवराज सिंह चौहान यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Sudesh Mitkar

Madhya Pradesh Election : भाजप मध्य प्रदेशात प्रचंड बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

एक्स हँडलवर पोस्ट करत शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे की, "भारत माता की जय, जनता जनार्दन की जय... मध्य प्रदेशात आज मतमोजणी पार पडत असून, मला विश्वास आहे की, जनतेच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्योतिरादित्य शिंदे चौहान यांच्या भेटीला

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे शिवराजसिंह चौहान यांच्या भेटीला निघाले असल्याची बातमी आहे.  या वेळी आपल्या प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, आमचे सेवेच्या आणि सुशासनाच्या सरकारला, जनतेचे पूर्ण आशीर्वाद दिला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की भाजपचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होईल.

सकाळपासून सुरू असलेली पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी संपली आहे. मात्र, कोणता पक्ष बहुमताकडे वाटचाल करतोय हे दुपारी दोननंतरच कळेल. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. मध्य प्रदेशातील काही विधानसभा जागांवर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT