Chhattisgarh Anti-Naxal campaign sarkarnama
देश

Chhattisgarh Anti-Naxal campaign : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई तब्बल ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा ; दोन जवान शहीद!

Chhattisgarh encounter News : चकमकीच्या ठिकाणाहून ऑटोमॅटिक हत्यारं आणि स्फोटकं जप्त केली गेली

Mayur Ratnaparkhe

Chhattisgarh Naxal News : छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात रविवारी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 31 नक्षलींचा खात्मा झाला. बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान चार जवान गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.

सुंदरराज यांनी सांगितले की इंद्रवती राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात बीजापूर आणि नारायणपूरशी लगत असलेल्या महाराष्ट्र सीमेवर रविवारी सकाळी त्यावेळी चकमकी सुरू झाली, जेव्हा जवानांचे एक पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. बस्तर पोलिसांनी सांगितले की परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

आयजीपी सुंदरराज यांनी सांगितले की ठार करण्यात आलेल्या नक्षलींची संख्या जास्तही असू शकते. चकमकीच्या ठिकाणाहून ऑटोमॅटिक हत्यारं आणि स्फोटकं जप्त केली गेली. छत्तीसगडमध्ये सुरक्षादल सातत्याने नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवत आहेत. डीआरजी बाजापूर, एसटीएफ, सी-60 चे जवान परिसरात शोधमोहीम राबवत आहेत.

बीजापूरमध्येच 1 फेब्रुवारी 2025 रोजी गंगालूर भागात पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक झाली होती. यामध्ये आठ नक्षली मारले गेले होते. मागील महिन्यात 20-21 जानेवारी दरम्यान छत्तीसड आणि ओडिशाच्या सीमेवर गरियाबंद जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत 16 नक्षली मारले गेले होते. यामध्ये 90 लाखांचा इनाम असलेल्या चलपतीचा देखील समावेश होता.

पी सुंदरराज यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, यावर्षी 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत राज्यात झालेल्या विविध चकमकींमध्ये 50 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. छत्तीसगड पोलिसांच्या मते राज्यात भाजप सरकार बनल्यापासून आतापर्यंत झालेल्या विविध चकमकीत जवानांनी 2019 नक्षलींना ठार केले होते. नोव्हेंबर 2023मध्ये छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आले होते आणि विष्णू देव साय मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर राज्यात नक्षलविरोधी मोहीमेस वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 पर्यंत राज्याला नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT